ऑनलाईन शॉपिंगच्या व्यसनापासून सुटका कशी करावी?

अमनने जी चूक केली, तशीच चूक आपल्यापैकी अनेक लोकं करतात. विशेषतः तरुण मुलांचा ब्रँडेड कपडे, ऍक्सेसरीज, दर आठवड्याला पार्टी, मॉलमध्ये नियमित शॉपिंग अश्या गोष्टींकडे कल असतो. आपण एकदाच जगणार आहोत, मग पैशाची बचत करून काय फायदा. त्यापेक्षा, भरपूर खर्च करा, फिरा, पार्टी करा, शॉपिंग करा आणि आयुष्याचा आनंद घ्या अशी तरुणांची मानसिकता असते. विशेष म्हणजे आपण इ-कॉमर्स साईट्सवर किती खर्च करतोय, हे आपल्यालाच माहित नसतं.

अमन इ-कॉमर्स वेबसाईटवर शॉपिंग करत होता, मी नवीन स्मार्टवॉच ऑर्डर केलं असं तो रवीला सांगतो. अमन, तू मागच्याच महिन्यात नवीन IPhone खरेदी केला होता ना, मग लगेच या महिन्यात नवीन स्मार्टवॉच कशाला घेतलंस, असं रवी अमनला विचारतो. तू दर महिन्याला किती शॉपिंग करतो, असं रवी त्याला विचारतो. माझं असं काही फिक्स बजेट नसतं, मी असंच टाईमपास म्हणून ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या वेबसाईट बघत असतो. कोणते नवीन प्रोडक्ट आले आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत, सध्या कोणता सेल चालू आहे याकडे माझं लक्ष असतं. एखादी वस्तू मला खूपच जास्त आवडली तरच मी ती खरेदी करतो, असं अमन म्हणाला. पण दर महिन्याला तू किती रुपयाची ऑनलाईन शॉपिंग करतो, असं रवी विचारतो. मी कधी हा आकडा कॅल्क्युलेट केला नाही, पण थांब आपण लगेच बघूया, असं अमन म्हणतो. तो लगेच ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माय अकॉउंटमध्ये जाऊन हिशोब चालू करतो. आपण मागच्या 12 महिन्यात या इ-कॉमर्स साईट्सवर तब्बल 3 लाख रुपयाची शॉपिंग केली आहे, हा एकदा ऐकून अमन आणि रवी दोघांनाही धक्का बसला. अमनला 6 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे दर महिन्याला मिळणाऱ्या 50000 रुपयांपैकी अमन 25000 रुपये शॉपिंगवर खर्च करतो. रूमचं रेंट आणि जेवणासाठी त्याचा 15000 रुपये खर्च होतो. याचा अर्थ खाण्यासाठी आणि राहण्यासाठी जेवढे पैसे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे तो शॉपिंगवर खर्च करतोय.

अमनने जी चूक केली, तशीच चूक आपल्यापैकी अनेक लोकं करतात. विशेषतः तरुण मुलांचा ब्रँडेड कपडे, ऍक्सेसरीज, दर आठवड्याला पार्टी, मॉलमध्ये नियमित शॉपिंग अश्या गोष्टींकडे कल असतो. आपण एकदाच जगणार आहोत, मग पैशाची बचत करून काय फायदा. त्यापेक्षा, भरपूर खर्च करा, फिरा, पार्टी करा, शॉपिंग करा आणि आयुष्याचा आनंद घ्या अशी तरुणांची मानसिकता असते. विशेष म्हणजे आपण इ-कॉमर्स साईट्सवर किती खर्च करतोय, हे आपल्यालाच माहित नसतं. माझ्यासारखे अनेक लोकं इ-कॉमर्स साईट्सवर जास्त शॉपिंग करत नाहीत, पण स्वीगी आणि झोमॅटोवर आमचा भरमसाठ खर्च होतो. शॉपिंग असो किंवा ऑनलाईन फूड ऑर्डर करणं असो, प्रत्येक गोष्ट आपण लिमिटमध्ये केली पाहिजे. नाहीतर पगार जेवढ्या स्पीडने येतो त्याच्या डबल स्पीडने खर्च ही होतो. शेवटी हातात काहीच शिल्लक राहत नाही. एक वेळ अशी येते, कि उत्पन्न जास्त वाढत नाही आणि खर्च कमी करणं शक्य नसतं. मग आपली चीड चीड चालू होते. ज्याप्रकारे दारू, सिगरेटचं व्यसन असतं, तसंच बऱ्याच लोकांना ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, यातून बाहेर कसं पडायचं? यासाठी कसं प्लॅनिंग करता येईल, ते आता जाणून घेऊया.

शॉपिंगच्या व्यसनातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात आधी आपण मागच्या 12 महिन्यात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो आणि स्वीगी, नायकासारख्या अँप्सवर किती खर्च केला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपण खर्च केलेली रक्कम योग्य असेल तर मग काहीच बदल करायची गरज नाहीये. मात्र, हा आकडा खूप जास्त असेल तर मात्र आपल्याला थोडी काटकसर करावी लागेल. यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बजेट निश्चित करावं लागेल. पगाराच्या किती % भाग शॉपिंगसाठी वापरायचा, ते आपल्याला ठरवावं लागेल. एकदा बजेट ठरवलं कि मग त्या बजेटनुसारच खर्च करावा लागेल. खास शॉपिंगसाठी आपण एक वेगळं सेविंग अकॉउंट वापरू शकतो. समजा अमनचा पगार आहे 50000 रुपये, यापैकी त्याने शॉपिंगसाठी 10000 रुपयाचं बजेट ठरवलं तर पगार झाल्यावर लगेच तो 10000 रुपये सॅलरी अकॉउंटमधून एका सेविंग अकॉउंटमध्ये ट्रान्स्फर करू शकतो. त्याला जी काही शॉपिंग करायची आहे, त्याचं पूर्ण पेमेंट त्याने याच सेविंग अकॉउंटमधून करावं. जोपर्यंत अकॉउंटमध्ये पैसे आहेत, तोपर्यंत तो कितीही खर्च करू शकतो. ज्यावेळेला त्याची शॉपिंग बजेटच्या वर जाईल, तेव्हा त्याला पैशाअभावी ऑटोमॅटिक शॉपिंग थांबवावी लागेल. अश्या पद्धतीने आपण स्वतःच स्वतःला शिस्त लावली आणि त्याचं काटेकोरपणे पालन केलं तर आपण या शॉपिंगच्या व्यसनातून नक्की बाहेर पडू शकतो. एकदा खर्च कमी झाला कि आपोआप पैसे शिल्लक राहतील आणि आपल्याला जास्तीत जास्त गुंतवणूक करून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येईल.

Published: May 4, 2024, 12:15 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App