ज्येष्ठ नागरिकांना आता सहज मिळणार मेडिक्लेम इंश्युरन्स

65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता इंश्युरन्स कंपन्या नवीन प्लॅन लॉन्च करतील. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये आता तुमच्या आई वडिलांचा समावेश करता येईल. त्यामुळे, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी पॉलिसी खरेदी करण्याची गरज राहणार नाही. IRDA ने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा खरंच फायदा होईल का, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या राजेशसारखे लोकं आता खुश आहेत. राजेशला आता त्याच्या आई वडिलांसाठी हेल्थ इंश्युरन्स खरेदी करता येईल. इंश्युरन्स कंपन्यांनी सर्व वयोगटातल्या लोकांना हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी द्यावी, असा महत्वाचा निर्णय IRDA ने जाहीर केला. पूर्वी बऱ्याच इंश्युरन्स कंपन्या 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना इंश्युरन्स देत नव्हत्या. या सेगमेंटमध्ये क्लेम येण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे इंश्युरन्स कंपन्या हि जोखीम घ्यायला तयार नव्हत्या. मात्र, ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन IRDA ने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. IRDA ने जाहीर केलेल्या सर्क्युलरने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता इंश्युरन्स कंपन्या नवीन प्लॅन लॉन्च करतील. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये आता तुमच्या आई वडिलांचा समावेश करता येईल. त्यामुळे, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी पॉलिसी खरेदी करण्याची गरज राहणार नाही. IRDA ने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा खरंच फायदा होईल का, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

इंश्युरन्स ही संकल्पना लॉ ऑफ ऍव्हरेजेसवर चालते. याचा अर्थ समजा 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांमध्ये एका वर्षात आजारी पाडण्याचं प्रमाण 10% असेल तर 100 ज्येष्ठ नागरिकांपैकी एका वर्षात साधारण 10 नागरिकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. प्रत्येक पेशंटचा सरासरी हॉस्पिटल खर्च समजा 5 लाख रुपये असेल, तर इंश्युरन्स कंपनीला 10 पेशंटसाठी एकूण 50 लाख रुपयाचा क्लेम द्यावा लागेल. या व्यतिरिक्त इंश्युरन्स कंपनीला कर्मचाऱ्यांचे पगार, एजेंटचं कमिशन आणि ऑफिसचे इतर खर्चदेखील असतात. समजा हे खर्च 10 लाख रुपये असतील, तर इंश्युरन्स कंपनीला या 100 पॉलिसीहोल्डरसाठी एकूण 60 लाख रुपयाचा खर्च करावा लागेल. हा खर्च अर्थातच सगळे पॉलिसीहोल्डर मिळून करतील. 60 लाख भागिले 100 म्हणजे प्रत्येक पॉलिसीहोल्डरला साधारण 60000 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. आता IRDA ने जो निर्णय घेतला आहे, त्यातून ज्येष्ठ नागरिकांना पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय मिळेल, मात्र त्यांना हे एवढे भरमसाठ प्रीमियम परवडतील का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याच उत्तर सोपं आहे, बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना हे प्रीमियम परवडणार नाहीत. त्यामुळे, IRDA ने इंश्युरन्स कंपन्यांना जरी ज्येष्ठ नागरिकांना पॉलिसी देण्याची सक्ती केली, तरी या पॉलिसीचे प्रीमियम खूप जास्त असतील. दुसरी अडचण म्हणजे, बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना हे प्रीमियम परवडणार नाहीत. त्यातच, इंश्युरन्स कंपनीसाठी या सेगमेंटमध्ये सर्वाधिक जोखीम आहे. त्यामुळे, को-पेमेंट आणि वेटिंग पिरिअडसारखे किचकट नियम आणि अटी टाकून इंश्युरन्स कंपन्या त्यांचा क्लेमचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतील.

IRDA ने ज्येष्ठ नागरिकांना मेडिक्लेम मिळावा म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे, पण IRDA ला आणखी एक पाऊल पुढे जाऊन प्रीमियम आणि नियम अटींसंदर्भात आणखी काही निर्णय घेण्याची गरज आहे. नाहीतर हा निर्णय कागदावरच राहील आणि नागरिकांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे, IRDA ने निर्णय चांगला घेतला आहे, मात्र यामध्ये आणखी पुढे जाऊन निर्णयाची अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच बरोबर, या निर्णयाचा फायदा करून घ्यायचा का नाही हे ज्येष्ठ नागरिकांच्या हातात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या पॉलिसी लॉन्च होतील, त्याचे प्रीमियम अर्थातच खूप जास्त असतील. मात्र, प्रीमियम जास्त आहेत म्हणून पॉलिसी घेण्याचा निर्णय पुढे ढकलू नका. 10 वर्षात एक जरी क्लेम आला तरी तुमच्या प्रीमियमचे सगळे पैसे वसूल होतील. आर्थिक फायदा किंवा नुकसान यापेक्षा मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला मनःशांती देईल. आता केंद्र आणि राज्य सरकारदेखील ज्येष्ठ नागरिकांना इंश्युरन्स कव्हर देत आहे, मात्र सरकारी धोरणं कधी बदलतील ते सांगता येत नाही. त्यामुळे, आपला स्वतःचा मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक, असतील आणि त्यांच्यासाठी अजूनही तुम्ही मेडिक्लेम खरेदी केला नसेल, तर लवकरात लवकर त्यांचा पॉलिसीमध्ये समावेश करा. आत्ता महाग आहे म्हणून मेडिक्लेम घेण्याचं टाळलं तर नंतर हॉस्पिटलचं बिल बघून पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.

Published: May 14, 2024, 20:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App