पीकविम्याच्या नुकसानीपोटी शेतकऱयांना मिळाले इतके कोटी

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीला बातमी पिक विम्याची
पंतप्रधान पिक विमा योजना आठ वर्षांपूर्वी सुरू झालीय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दाव्यापोटी आतापर्यंत एक लाख 59 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांनी एकत्र 32,329 कोटी रुपयांचा हप्ता भरला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना फक्त एका रुपयांत पिक विमा मिळतो. भरपूर अनुदान असलेल्या पीक विम्याच्या योजनेत शेतकऱ्यांनी 100 रुपयांचा हप्ता भरल्यास त्यांना 500 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. सध्या भारतातील 22 राज्यांतील सुमारे चार कोटी शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी आहेत.

आता बातमी रस्ते बांधणीची
सध्या देशभरात निवडणूका सुरू असल्यानं रस्ते बांधणीचा वेग मंदावला आहे. एप्रिल महिन्यात फक्त 483 किलोमीटर रस्ते बांधणीचे काम पूर्ण झालंय. तसेच सध्या रस्ते बांधकामाचे प्रकल्प कंपन्यांना देण्यात येत नाहीत. गेल्य वर्षी एप्रिल महिन्यात 114 रस्ते प्रकल्पाचे काम कंपन्यांना देण्यात आले होते
रस्ते बांधणीचा वेग मंदावला असला तरीही राष्ट्रीय वाहतूक आणि रस्ते प्राधिकरणाकडून 54,000 कोटी रुपये एप्रिल महिन्यात भांडवली खर्च करण्यात आलाय.

आता बातमी खाद्यतेलाची
सोयाबीन आणि मोहरीच्या उत्पादनात वाढ झाल्यानं खाद्यतेलाच्या आयातीत घट झालेली दिसून येत आहे. पाम,सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात
12 टक्क्यांनं घटलीय. 2023-24 या वर्षातील नोव्हेंबर ते ऑक्टोबर दरम्यान 70 लाख 14 हजार मेट्रिक टन तेलाची आयात करण्यात आलीय .रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफूल भारतात आयात होते

आता बातमी विम्याची
सर्वसाधारण विम्याच्या हप्त्यापोटी जमा होणाऱ्या रक्कमेत वार्षिक 16 टक्के वाढ झालीय. एप्रिल महिन्यात
सर्वसाधारण विमा म्हणजेच Non life insurance च्या हप्तापोटी जवळपास 29 हजार 561 कोटी रुपयांचा हप्ता जमा झालाय. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 25,431 कोटी रुपयांचा हप्ता जमा झाला होता. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या हप्त्यात वार्षिक 3.93 टक्के वाढ झाली. तर ICICI lOMBARD च्या हप्त्यात 22.65 टक्के तर बजाज ALLIANZ च्या हप्त्यात वार्षिक 45.42 टक्के वाढ झालीय

येत्या जूनपासून मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवाचा विम्याच्या हप्त्याचं ओझं कमी करण्यााठी सरकारननं दोन विमा योजनेचा अंतर्भाव एकाच विमा योजनेत केलाय. तसेच दोन्ही विमा योजना एकत्र केल्यानं विम्याचा दावा करणंही सोपं होणार आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि तसेच ग्रुप अपघाती विमा योजनेअंतर्गत आता पाच लाख रुपयांचा विम्याचे कवच मिळणार आहे. तर अपघातात मृ्त्युमुखी झाल्यास तीन लाखांचा विमा तसेच कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. या विमा योजनेला शंभर टक्के अनुदान आहे. मासेमाऱ्यांना कोणताही हप्ता भरावा लागत नाही.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

Published: May 15, 2024, 15:26 IST

पीकविम्याच्या नुकसानीपोटी शेतकऱयांना मिळाले इतके कोटी