BJP चं मुख्यालय बांधणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी

PSP म्हणजे प्रल्हाद S पटेल. प्रल्हाद पटेलांनी 2008 मध्ये PSP प्रोजेक्ट्सची स्थापना केली. याआधी त्यांनी कन्स्ट्रक्शन सेगमेंटमध्ये 30 वर्ष व्यवसाय केला आहे. PSP प्रोजेक्ट्सनी अनेक सरकारी संस्थांसाठी बिल्डिंग बांधल्या आहेत. तसेच, अनेक कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आणि निवासी प्रकल्प कंपनीने पूर्ण केले आहेत.

कंपनीने आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. भारतीय जनता पार्टीचं मुख्यालय देखील PSP प्रोजेक्ट्स नी बांधलं आहे. कंपनीसाठी गुजरात हे होम ग्राउंड असलंतरी कंपनीने UP मध्ये मेडिकल कॉलेज, EWS हाऊसिंग प्रोजेक्ट, काशी विश्वनाथ प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. याच बरोबर कंपनीने अनेक राज्यांमध्ये अनेक मोठे प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. वेळेवर प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं ट्रॅक रेकॉर्ड असल्यामुळे या कंपनीचं मार्केटमध्ये नाव चांगलं आहे, म्हणूनच त्यांना अनेक मोठे प्रोजेक्ट मिळतात.

PSP प्रोजेक्ट्स ही 2500 कोटींचं मार्केट कॅप असणारी स्मॉलकॅप कंपनी आहे. कंपनीने मागच्या 12 महिन्यात साधारण 2540 कोटींचं उत्पन्न आणि 155 कोटींचा नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये कंपनीने 210 कोटींचं उत्पन्न आणि 10 कोटींचा नफा कमावला होता. म्हणजे मागच्या 10 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात तब्बल 12 पट तर नफ्यामध्ये तब्बल 15 पट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही इन्फ्रा कंपनी असूनदेखील कंपनीला मागच्या 10 वर्षात एकदाही लॉस झाला नाहीये. कोविडमध्ये सबंध जग अडचणीत असताना कंपनीने प्रॉफिट मार्जिन मेंटेन केलं आणि 129 कोटींचा नफा कमावला. मागच्या 5 वर्षात कंपनीने सरासरी 25% रिटर्न ऑन इक्विटी कमावला आहे. कंपनीवर सध्या 400 कोटींचं कर्ज आहे, मात्र कंपनीकडे त्याच्या समोर 800 कोटींचे रिजर्व्हसदेखील आहेत. त्यामुळे, कंपनीचा डेट टू इक्विटी 0.5 आहे, याचा अर्थ कंपनीने खूप जास्त कर्ज घेतलं नाहीये. एकंदरीत विचार केल्यास, इन्फ्रा सेगमेंटमध्ये असूनदेखील कंपनीने सातत्याने व्यवसायात वाढ केली आहे. नुसतीच वाढ नाहीतर कंपनीला प्रॉफिट मार्जिन आणि रिटर्न ऑन इक्विटी मेंटेन करता आला आहे.

कंपनीने मागच्या 1 वर्षात साधारण 2540 कोटींचं उत्पन्न कमावलं आहे, आणि ही कंपनी सध्या 2500 कोटींच्या मार्केट कॅपला ट्रेड करतीये. म्हणजे प्राईज टू सेल्सचा विचार केला तर हा शेअर अतिशय रिजनेबल व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय. PE रेशिओचा विचार केला तर हा शेअर 16 च्या मल्टिपलला ट्रेड करतोय. कंपनीच्या व्यवसायात होणारी वाढ, नेट प्रॉफिट मार्जिन, रिटर्न ऑन इक्विटी, बिझनेस आऊटलूक आणि बिझनेसमध्ये असणारं सातत्य लक्षात घेता शेअरचं व्हॅल्युएशन महाग नाहीये. सध्या भारतातल्या मार्केटमध्ये बरेच शेअर्स खूप ओव्हर वॅल्यूड झाले आहेत, मग अश्या परिस्थितीत PSP प्रोजेक्ट्ससारखा शेअर आपल्याला सापडला तर ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे. कंपनीचा IPO 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला आणि त्यानंतर शेअर्सचं लिस्टिंग झालं. त्यानंतर, या शेअरने एप्रिल 2018 मध्ये 595 रुपयाचा उच्चांक नोंदवला. नंतर शेअरमध्ये 5 वर्षांचं टाइम आणि प्राईज करेक्शन झालं आणि शेअरने शेवटी 2022 मध्ये ब्रेकआऊट दिला. 600 रुपयाच्या ब्रेकआऊट लेव्हलच्या तुलनेत हा शेअर सध्या 700 रुपयाला ट्रेड करतोय. म्हणजे टेक्निकल्सचा विचार केला तर अजूनही उशीर झाला नाहीये. आपण या शेअरमध्ये 500 ते 700 रुपयाच्या रेंजमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केली तर आपली जोखीम कमी होईल. मात्र, 4 जूनला अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला, तर शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पडझड होऊ शकते. असं झाल्यास PSP प्रोजेक्ट्सचा शेअर 400 ते 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, असं झालं तरी कंपनीच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही.

Published: May 6, 2024, 15:08 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App