CD रेशिओ 20 वर्षांच्या उच्चांकावर, कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम?

भारतातल्या बँकिंग सिस्टीमचा क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ आता 20 वर्षांच्या उच्चांकावर आला आहे. पण क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ म्हणजे नक्की काय, हा रेशिओ का महत्वाचा आहे, त्याचा बँकांच्या प्रॉफिटॅबलिटीवर कसा परिणाम होतो आणि या अडचणीच्या काळात कोणत्या बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे, ते आता जाणून घेऊया.

भारतातला बँकिंग सेक्टर खूप मोठ्या संकटात सापडला आहे, मागच्या भारतीय बँकिंग सिस्टीमसाठी 20 वर्षातला हा सर्वात कठीण फेज आहे. कर्ज आणि डिपॉजिट या दोन्हीची वाढ योग्य पद्धतीने झाली तरच बँका व्यवसाय करू शकतात. मात्र, मागच्या काही वर्षात विशेषतः कोविडनंतर कर्जाच्या मागणीत खूप मोठी वाढ झाली आहे, पण त्या प्रमाणात डिपॉजिट वाढत नाहीयेत. त्यामुळे, बँकांच्या क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओवर नकारात्मक परिणाम झाला आहे. भारतातल्या बँकिंग सिस्टीमचा क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ आता 20 वर्षांच्या उच्चांकावर आला आहे. पण क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ म्हणजे नक्की काय, हा रेशिओ का महत्वाचा आहे, त्याचा बँकांच्या प्रॉफिटॅबलिटीवर कसा परिणाम होतो आणि या अडचणीच्या काळात कोणत्या बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे, ते आता जाणून घेऊया.

CD म्हणजे क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ. बँकांकडे असणाऱ्या डिपॉजिटसच्या तुलनेत त्यांनी किती कर्ज दिलं आहे, ते आपल्याला CD रेशिओतुन कळतं. समजा बँकांकडे 100 रुपयाचे डिपॉजिट असतील आणि त्यांनी 70 रुपयाचं कर्ज दिलं, तर CD रेशिओ झाला 70%. हा रेशिओ कधीच 100 च्या वर जाऊ शकत नाही. ऐतिहासिक आकडेवारीनुसार CD रेशिओ 70 च्या जवळपास असतो, मात्र आता हा रेशिओ 80 टक्याच्या वर गेला आहे. याआधी, हे 2005 मध्ये झालं होतं. रिजर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार, CD रेशिओमध्ये 2023 24 या आर्थिक वर्षात 0.38 टक्याची वाढ झाली आणि, हा रेशिओ 80.30 वर पोहोचला. मात्र, केअर एजने दिलेल्या माहितीनुसार यामागे HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं मर्जर हे मुख्य कारण आहे. हे मर्जर नसतं झालं, तर CD रेशिओ सध्या 78.1 टक्यावर असता. पण 78.1 हा आकडादेखील जास्तच आहे. म्हणजे, CD रेशिओ वाढण्यामागे केवळ HDFC चं मर्जर हे एकमेव कारण नाहीये. मागच्या 4 वर्षात कोविडनंतर अर्थव्यवस्थेचं गणित पूर्णपणे बदललं आहे. कोविडनंतर K शेप रिकव्हरी आली, याचा अर्थ काही लोकांना कोविडचा फायदा झाला तर काही लोकांना त्याचा फटका बसला. ज्या लोकांचं कोविडमुळे नुकसान झालं, त्यांनी कर्ज घेऊन वेळ मारून नेली आणि म्हणूनच CD रेशिओमध्ये खूप मोठी वाढ झाली.

क्रेडिट टू डिपॉजिट रेशिओ वाढण्यामागे कर्जाचं प्रमाण वाढणं हे एक कारण आहे, मात्र यासाठी दुसरा एक महत्वाचा फॅक्टर जवाबदार आहे. तो म्हणजे डिपॉजिटची वाढ. कोविडनंतर, लोकांच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत देखील खूप मोठा बदल झाला आहे. कोविडच्या दरम्यान, रेपो रेट 4 टक्यावर पोहोचला होता. त्यामुळे, FD वर 5 ते 6% व्याज मिळत होतं. दुसऱ्या बाजूला, मागच्या 10 20 वर्षात लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, मात्र टॅक्स स्लॅबमधे सरकारने कोणतेच बदल केले नाहीयेत. त्यामुळे, अनेक करदात्यांना त्यांच्या नोकरी व्यवसायातून 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं. त्यामुळे, FD किंवा इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर थेट 30 टक्यानुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो. आता विचार करा, FD वर व्याज मिळत होतं 5%, त्यावर 30% इन्कम टॅक्स म्हणजे हातात जेमतेम 3 – 3.5% शिल्लक राहतात. एवढा कमी रिटर्न मिळत असल्यामुळे, लोकांनी गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधायला सुरुवात केली. कोविडच्या दरम्यान शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली होती, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेतला. म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळतोय म्हंटल्यावर गुंतवणूकदारांनी FD मध्ये गुंतवणूक न करता त्यातला काही पैसा म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटकडे वळवला. यामुळे, बँक डिपॉजिटमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. मात्र, पुढच्या 3 वर्षात CD रेशिओ कमी होईल असा आमचा अंदाज आहे. आता कर्जाचे व्याजदर बऱ्यापैकी वाढले आहेत, त्यामुळे लोकं जास्त कर्ज घेणार नाहीत, उलट अनेक कर्जदार कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतील, दुसऱ्या बाजूला शेअर मार्केट ओव्हर वॅल्यूड झाल्यामुळे, मागच्या 4 वर्षासारखा रिटर्न आता मिळणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे, इक्विटीची क्रेज कमी होईल आणि इक्विटीचा काही पैसा FD सारख्या सुरक्षित ऍसेट्समध्ये जाईल.

Published: May 2, 2024, 11:08 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App