क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय?

डेट फंडमध्ये हाय रिस्क, हाय रिटर्न हा फॉर्म्युला आपण कायम लक्ष्य ठेवला पाहिजे. एखाद्या फंडमध्ये जास्त रिटर्न मिळतोय, याचा अर्थ त्या फंडमध्ये जास्त जोखीम आहे. क्रेडिट रिस्क फंड हे डेट कॅटेगरीमधील हाय रिस्क फंड आहेत. ज्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग कमी आहे, अश्या लहान किंवा तुलनेने जास्त जोखीम असणाऱ्या कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये क्रेडिट रिस्क फंड गुंतवणूक करतात.

मुकेशने काही दिवसांपूर्वी एका आर्थिक सल्लागाराच्या सांगण्यावरून डेट कॅटेगरीमध्ये क्रेडिट रिस्क फंड खरेदी केला होता, मात्र त्याला चांगला रिटर्न मिळाला नाही. तू व्यवस्थित एनालिसी केलं नव्हतं का, असं जतीन मुकेशला विचारतो. अरे माझ्या आर्थिक सल्लागाराने मला डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला, त्याने मला लॉन्ग टर्म डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता, पण मी गुगलवर थोडा रिसर्च केला. लॉन्ग टर्म डेट फंड्सपेक्षा जास्त रिटर्न क्रेडिट रिस्क फंड्सनी दिला, क्रेडिट रिस्क फंड्सचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून मी त्यात गुंतवणूक केली. मुकेश तुला गुगलवर माहिती मिळेल पण चांगला सल्ला एक आर्थिक सल्लागारच देऊ शकतो, असं जतीन म्हणाला. मुकेशने क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय, त्यामध्ये किती जोखीम असते आणि हे फंड आपल्यासाठी योग्य आहेत. याचा विचार न करता केवळ पास्ट परफॉर्मन्स बघून गुंतवणूक केली. आपल्या बाबतीत असं होऊ नये, म्हणून आज आपण क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय ते जाणून घेऊया.

Anchor Link 1
मुकेशप्रमाणे अनेक गुंवतवणूकदार केवळ मागच्या 1 2 वर्षाचा रिटर्न बघून गुंतवणूक करतात. पण मागच्या काही वर्षात फंडने चांगला दिला म्हणजे तो फंड तसाच रिटर्न भविष्यात देईल, याची काहीच गॅरंटी नसते. तसेच, एखाद्या कॅटेगरीने मागच्या काही वर्षात खराब कामगिरी केली आहे म्हणून त्या फंडमध्ये गुंतवणूक न करणं हे देखील चुकीचं आहे. फंडने चांगली कामगिरी केली असेल तर ती का केली आणि खराब कामगिरी केली असेल तर त्यामागे काय कारणं आहेत, येत आधी जाणून घेतलं पाहिजे. उदारणार्थ, 2019 पर्यंत HDFC च्या बॅलन्स्ड एडव्हान्टेज फंडने खराब कामगिरी केली. HDFC म्युच्युअल फंडचे तत्कालीन CEO प्रशांत जैन यांनी सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक केली होती. त्यांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली होती, मात्र कंपन्यांची कामगिरी सुधारण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, 2021 नंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप मोठी तेजी आली आणि HDFC बॅलन्स्ड एडव्हान्टेज फंडने खूप चांगला रिटर्न दिला. हा फंड बॅलन्स्ड एडव्हान्टेज फंड कॅटेगरीमध्ये आता मार्केट लीडर आहे.

हाच प्रकार डेट फंडमध्ये पाहायला मिळतो. डेट फंडमध्ये हाय रिस्क, हाय रिटर्न हा फॉर्म्युला आपण कायम लक्ष्य ठेवला पाहिजे. एखाद्या फंडमध्ये जास्त रिटर्न मिळतोय, याचा अर्थ त्या फंडमध्ये जास्त जोखीम आहे. क्रेडिट रिस्क फंड हे डेट कॅटेगरीमधील हाय रिस्क फंड आहेत. ज्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग कमी आहे, अश्या लहान किंवा तुलनेने जास्त जोखीम असणाऱ्या कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये क्रेडिट रिस्क फंड गुंतवणूक करतात. उदारणार्थ, SBI क्रेडिट रिस्क फंडने आधार हाऊसिंग, आवन्स फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि रेंसर्व ग्लोबलसारख्या कमी रेटिंग असणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांचं रेटिंग कमी असतं, त्यामुळे या कंपन्या जास्त व्याजदर देतात. त्यामुळे, फंडला जास्त रिटर्न मिळवता येतो. मात्र, कधी कधी एखादी कंपनी आर्थिक संकटात सापडते. असं झाल्यास कंपनीच्या बॉण्डची व्हॅल्यू कमी होते आणि फंडला त्याचा फटका बसतो. उदारणार्थ, 1 महिन्याच्या रिटर्नचा विचार केला तर ICICI क्रेडिट रिस्क फंडने निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. मात्र, मागच्या 1 वर्षात याच फंडने 7.26% दिला आहे. दुसरं उदाहरण DSP क्रेडिट रिस्क फंडच बघूया. या फंडने 2018 मध्ये निगेटिव्ह रिटर्न दिला, तर ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 या 2 वर्षात DSP च्या फंडने काहीच रिटर्न दिला नाही.

काही कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये या फंडला नुकसान झालं. अनेक गुंतवणूकदारांनी घाबरून या फंडमधून पैसे काढू घेतले. 2020 21 मध्ये फंडचा पास्ट परफॉर्मन्स खराब होता म्हणून कोणताही गुंतवणूकदार या फंडमध्ये गुंतवणूक करायला तयार नव्हता. मात्र, परिस्थिती बदलली आणि फंडने पुन्हा एकदा चांगला कामगिरी केली. मागच्या 3 वर्षात फंडने वार्षिक 9% रिटर्न दिला आहे, तर 1 वर्षात 15% रिटर्न देऊन दमदार कामगिरी केली आहे. सांगण्याचा हेतू असा आहे कि 2018 मध्ये फंडने खराब कामगिरी केली म्हणून त्यातून पैसे काढणं जितकं चुकीचं आहे, तितकंच आता त्याचा पास्ट परफॉर्मन्स बघून गुंतवणूक कारणं चुकीचं आहे. क्रेडिट रिस्क फंडमध्ये थोडा लॉस होऊ शकतो. मात्र, तुम्ही चांगल्या फंड हाऊसच्या क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला चांगला रिटर्न नक्की मिळेल. ज्यांची जास्त जोखीम घेण्याची क्षमता आहे, केवळ अश्याच गुंतवणूकदारांनी क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करावी. 3 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर लॉन्ग टर्म डेट फंड्स हा अधिक चांगला पर्याय आहे. टॅक्सेशनच्या दृष्टीने आर्बिट्राज फंड्स क्रेडिट रिस्क फंड्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत.

Published: April 27, 2024, 18:49 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App