मुंबईतील मागणी आणि पुरवठा सकारात्मक असल्यानं घर खरेदीदारांनी मालमत्ता बाजारावर आपल्या विश्वास कायम ठेवला आहे. या विश्वासामुळेच मुंबईतील मालमत्ता बाजारात मोठी तेजी आलीय. एकूण नोंदणीकृत मालमत्तापैकी सुमारे 80 टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा आहे तर 20 टक्के वाटा हा अनिवासी मालमत्तांचा आहे.
मुंबई, पुण्यात घरांची खरेदी जोरात
11 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईत विक्रमी घर खरेदी
सरकारच्या महसूलातही विक्रमी वाढ
मोठ्या घरांची मागणी वाढली
मुंबईत शहर (मुंबई पालिकेखालील अखत्यारित) जानेवारी ते डिसेंबर 2023 पर्यंत तब्बल एक लाख 26 हजार 937 घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले. 2013 नंतर पहिल्यांदाच नव्या आणि जुन्या मालमत्तांची विक्री पहिल्यांदाच पाहायला मिळाली .या व्यवहारातून सरकाराला 10, 870 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. तसेच दहा वर्षात पहिल्यांदाच विक्रमी मुद्रांक शुल्क मिळाले. मुद्रांक शुल्कातही वार्षिक 22 टक्के वाढ झालीय.
नाईट फ्रँक इंडियाने मुंबईतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील मागणी आणि पुरवठा सकारात्मक असल्यानं घर खरेदीदारांनी मालमत्ता बाजारावर आपल्या विश्वास कायम ठेवला आहे. या विश्वासामुळेच मुंबईतील मालमत्ता बाजारात मोठी तेजी आलीय. एकूण नोंदणीकृत मालमत्तापैकी सुमारे 80 टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा आहे तर 20 टक्के वाटा हा अनिवासी मालमत्तांचा आहे.
एकूण घरांच्या खरेदीत मध्य आणि पश्चिम उपनगरांचा वाटा हा 75 टक्के आहे. या भागात अनेक नवीन प्रकल्प लॉण्च झाले आहेत तसेच या प्रकल्पात अत्याधुनिक सोयी सुविधा तसेच चांगली कनेक्टिव्हिटी आहे. पश्चिम उपनगरातील 85 टक्के ग्राहक तसेच मध्य उपनगरातील 83 टक्के ग्राहकांनी त्यांच्या सध्या राहत असलेल्या घरांच्या जवळपास घर खरेदी केलंय .परिचित भाग, तसेच किंमत आणि इतर सोयी-सुविधा मिळत असल्यानं ग्राहकांनी सध्या राहत असलेल्या भागातच घर खरेदी केलीय.
मुंबई प्रमाणेच पुण्यातही घरांची खरेदी जारोत सुरू आहे. पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 17 हजार 570 घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले . गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 23 टक्के वाढ झाली आहे. या व्यवहारातून सरकारला 620 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले आहेत. मुद्रांक शुल्कातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये घरांच्या विक्रीत पन्नास लाख ते एक कोटी रुपयांच्या घरांचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण विक्रीत अशा घरांचे प्रमाण 32 टक्के आहे.
नागरिकांच्या उत्पन्नात वाढ, परडवणाऱ्या किंमती तसेच घर खरेदीचा अभिमानात वाढ झाल्यानं तब्बल 11 वर्षानंतर घर खरेदीचा विक्रम मोडला आहे.
विशेष म्हणजेच अलिशान घर खरेदीमध्ये 57 टक्के वाढ झाली आहे. स्थिर व्याज दर तसेच मोठं घर खरेदीची आकांक्षा यामुळे मुंबईतील मालमत्ता क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे,असं मत नाइट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केलंय.
Published: March 28, 2024, 11:45 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App