BSNL ची 4G सेवा ऑगस्टपासून

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

ऐन निवडणुकीत हरभरा डाळी महाग झाल्यामुळे केंद्र सरकार सावधगिरी बाळगताना दिसतेय.. त्यामुळे डाळींवर असलेले 66 टक्के आयात शुल्क घटवून शून्यावर आणण्यात आलंय. तसेच हरभरा डाळीच्या आयातीसाठी 31 मार्च 2025 पर्यंत परवानगी देण्यात आलीय.यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट झालीय. 120 लाख टन उत्पादनाचा अंदाज असताना प्रत्यक्षात 90 लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यानं हरभऱ्याला 5,700 ते 6,000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हरभऱ्याप्रमाणे तुरीचे दरही हमीभावापेक्षा जास्त आहेत. . तसेच सरकारनं वाटाण्यावरी आयात शुल्कही शून्यावर आणले आहे. तसेच वाटाण्याच्या आयातीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय

 

चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीचा वाढीचा अंदाज साडेसहा टक्क्यांवरून वाढवून 7.1 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च या पतमानांकन संस्थेने हा सुधारित अंदाज वर्तविला. इंडिया रेटिंग्ज वर्तविलेला सुधारित अंदाज हा चालू आर्थिक वर्षातील विकास दराच्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन अनुमानापेक्षा थोडा जास्त आहे.

देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता निर्देशांक म्हणजेच सर्विसेस पीएमआय इंडेक्स मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये किंचित कमी आहे. तरीही सेवाक्षेत्रातील वाढ कायम राहणार आहे. .भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक एप्रिल महिन्यात 60.8 गुणांवर नोंदला गेला. मार्चमध्ये हा गुणांक 61.2 होता. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलापातील वाढीचा वेग मंदावला असला तरी त्याचा दर सकारात्मक आहे

सरकारी मालकीच्या बीएसएनएल कंपनीला अखेर 4 जी सेवा सुरू करण्यास मुहूर्त गवसलाय, येत्या ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्रीय स्तरावर 4 जी सेवा सुरू करणार असणार असल्याचे कंपनीनं माहिती दिलीय. . केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणांतर्गत कंपनीकडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: May 7, 2024, 15:10 IST

BSNL ची 4G सेवा ऑगस्टपासून