जिंदाल अदानींच्या सागरी वर्चस्वाला धक्का देणार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

 

नमस्कार बातमीपत्राच्या सुरवातीला सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी
सर्वसामान्यांना आरोग्य विमा खरेदी करता यावा यासाठी केंद्र सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी वस्तू आणि सेवा कर कमी करण्यात येणार आहे. सध्या आरोग्य विम्यावर 18 टक्के जीएसटी आहे त्याऐवजी आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे त्यामुळे तीस हजार रुपयांचा हप्ता असलेला आरोग्य विम्याचा हप्ता कमी होणार आहे.

आता बातमी गृहनिर्माण क्षेत्रातील
कोरोनानंतर गृहनिर्माण क्षेत्रात तेजी आलीय. अनेक जणांनी घर खरेदीला प्राधान्य दिलंय त्यामुळे गृह कर्जात देखीव वाढ झालीय . गेल्या दोन वर्षात गृहनिर्माण कर्जात दहा लाख कोटी रुपयांची वाढ झालीय. मार्चअखेरपर्यंत 27 लाख कोटी रुपयांचं कर्ज गृह कर्जासाठी घेण्यात आलंय. गृहकर्जात होत असलेली वाढ ही बांधकाम क्षेत्रातील तेजी दर्शवत आहे. सरकारच्या प्रोत्साहनामुळे परडणाऱ्या घरांची देखील मागणी वाढलीय.

मार्च तिमाहीतील टायटन कंपनीचा निकाल अपेक्षेप्रमाणं न लागल्यानं शेअरमध्ये सात टक्क्यांची घसरण झालीय. एनसएसईवर टायटनच्या एका शेअरची किंमत 7.57% कमी होऊन 3,285 रुपयांवर पोहचली होती. विशेष म्हणजे प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुणझुणवाला यांची पत्नी रेखा झुणझुणवाला मोठी गुंतवणूक टायटनमध्ये आहे.टायटनच्या शेअरमधील आजच्या घसरणीनंतर त्यांचं 800 कोटींहून अधिक प्रतिकात्मक नुकसान झालंय .

आता बातमी कृषी कर्जाची

कृषीक्षेत्रात निर्धारित 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असताना तब्बल 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. 2023-24 या आर्थिक वर्षात व्यावसायिक बँका,सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांनी गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के पीककर्ज आणि मुदत कर्जाचं वाटप केलंय.
विशेष म्हणजे 2.72 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे कृषीपूरक व्यवसाय उदाहरणार्थ दुग्धव्यवसाय,मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन क्षेत्रात करण्यात आलंय . दक्षिण भारतातील शेतकऱ्यांचं कर्ज परत करण्याची क्षमता, तसेच इतर घटक कर्ज देण्यास चांगले असल्यानं त्यामुळे दक्षिणेकडील राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झालंय.

कमर्शियल कार्गो व्यवसायत अदानी समूहाचा दबदबा आहे. अदानीच्या बालेकिल्याला आव्हान देण्यासाठी JSW INFRASTRUCTURE ही कंपनी सरसावली आहे. केंद्र सरकारकडून बंदरांचं मॉनियाझेशन करत येत असल्यानं कंपनीनं वाढवण बंदरासाठी 77 हजार कोटी, निकोबार बंदरात 44 हजार कोटी तर तुतीकोरीन बंदरासाठी निविदा दाखल करणार आहे. पश्चिम आणि पूव किनारपट्टीवर JSW कडे दहा बंदरं आहेत.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: May 6, 2024, 17:29 IST

जिंदाल अदानींच्या सागरी वर्चस्वाला धक्का देणार